corona 
महाराष्ट्र बातम्या

राज्याचा धोका वाढला; डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे विषाणू आढळले

नामदेव कुंभार

delta plus variant Maharashtra news : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्र सामना करत आहे. सध्या रुग्णसंख्या थोड्याफार प्रमाणात आटोक्यात आल्याचं चित्र आहे. दररोज पाच ते सहा हजारांच्या आसपास नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे 15 ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील निर्बंध शिथिल केले असतानाच चिंतेची बातमी समोर आली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचे वेगवेगळ्या तीन प्रकारचे विषाणू महाराष्ट्रात आढळले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या या तीन प्रकारामुळे कोरोना महामारीचा धोका आणखी वाढला आहे. तसेच डेल्टा प्लस विषाणूने तज्ज्ञांच्या चिंतेतही भर घातली आहे. या नव्या तीन व्हेरियंटचा तज्ज्ञ अभ्यास करत आहेत.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या 66 रुग्णांची भर आहे. त्यामध्ये आज कोल्हापूरच्या सात रुग्णांची भर पडल्याची माहिती समोर आली आहे. विषाणूच्या जिनॉम सिक्वन्सिंगच्या माहितीनुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन विविध प्रकार आहेत. त्यांना Ay.1, Ay.2 आणि Ay.3 अशी नावं देण्यात आली आहेत. यासोबतच तज्ज्ञांनी डेल्टा प्लसच्या आणखी 13 उपवंशांचा शोध लावला आहे. Ay.1, Ay.2, Ay.3 पासून त्यांची सुरुवात होते आणि हीच यादी 13 पर्यंत जाते.

धोकादायक डेल्टा व्हेरियंटच्या म्युटेशनमुळे डेल्टा प्लसची निर्मिती झाली आहे. डेल्टा व्हेरियंटमधील स्पाईक प्रोटिनमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे तीन वेगवेगळे प्रकार आढळल्यामुले चिंता वाढली आहे. देशातील ही पहिलीच घटाना असल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटचे 11 रुग्ण आहेत. त्यापैकी एका एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाने दोन लसीचे डोस घेतले होते. या महिलेच्या संपर्कातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील दोन जणांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT