Tirupati Balaji Committee
Tirupati Balaji Committee Sakal
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे तिरुपती दर्शनाला; मुंबईतील मंदिरासंदर्भात दिलं पत्र

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई : मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदीर उभारण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकार मुंबईत व्यंकटेश्वराचं मंदीर उभारण्यासाठी जमीन भाड्याने देणार असून त्यासंदर्भातील पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी (Y.V. Subba Reddy) यांच्याकडे तिरुपती येथे जाऊन सुपूर्द केले आहे. त्यानंतर तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी समाधान व्यक्त केले.

(Tirupati Balaji Mandir In Mumbai)

नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. आज पहाटे आदित्य ठाकरे यांचे तिरुपती येथे आगमन झाले होते. त्यांनी प्रारंभी पद्मावती दर्शन केले आणि त्यानंतर हे पत्र सुपूर्द केले आहे. त्यावेळी तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, देवस्थानाचे सदस्य मिलिंद नार्वेकर, युवा सेनेचे राहुल कनाल, सूरज चव्हाण व देवस्थानाचे इतर अधिकारी हे देखील उपस्थित होते.

Tirupati Balaji Committee

तिरुपती देवस्थानाने विनंती केल्यावर सिडको तसेच राज्य शासनाने अतिशय कमी कालावधीत याविषयीचा निर्णय घेऊन जमीन उपलब्ध करून दिली, त्यामुळे बालाजीच्या लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे. जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे तिरुपतीला आले याविषयीही देवस्थानचे अध्यक्ष्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.

दरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगळूर, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

Tirupati Balaji Committee

नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन हा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT