Ramesh Bais Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramesh Bais: 'वीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार'; राज्यपालांचं मोठं वक्तव्य

सावरकरांच्या जन्मजस्थळी त्यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचीही माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले होते. तर आता ते चर्चेत आले आहेत त्याचं कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे.

'वीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला पाहीजे. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचं भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. तर 'ने मजसी ने मातृभूमीला' आणि 'जयस्तुते जयस्तुते' या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हंटलं आहे.

28 मे रोजी सावकरांची 140 वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचंही लोकार्पण केलं जाणार आहे, अशी माहितीही राज्यपालांनी दिली आहे.

'वीर सावरकरांचे कार्य महान आहे. त्यांचे विचार उत्तुंग होते. सावरकर फक्त व्यक्ती नाही तर विचार आहेत. आपण सावरकरांचे अनेक प्रकारे वर्णन करू शकतो. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान प्रचंड मोठं आहे. काही वेळा त्यांच्या विरोधात लिहिले गेले. पण ते सगळं विसरून या ठिकाणी त्यांचे विचार पुढे घेऊन गेलं पाहिजे. त्यासाठी सावरकर यांच्या विचारांचा प्रचार केला पाहिजे', असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT