पाली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) देव, धर्माला विरोध नाही; तर त्या नावाने होणाऱ्या फसवणूक, शोषण आणि अंधश्रद्धेला (superstition) विरोध आहे, असे स्पष्टीकरण अंनिसच्या कार्यकर्त्या ॲड. मुक्ता दाभोळकर (Mukta dabholkar) यांनी दिले. सुधागड (sudhagad) तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे सोमवारी (ता. २१) चिवे आश्रमशाळेत ‘शैक्षणिक अभ्यासक्रम व वैज्ञानिक दृष्टिकोन’ कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या संकल्पनेतून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्यांमुळे लहानपणी मुलांच्या मनामध्ये अव्यक्त भीती बसते. ती मोठेपणी तशीच राहते. त्यामुळेच निरीक्षण तर्क, अनुमान व निष्कर्ष लढविला, तर अंधश्रद्धेला कोणी बळी पडणार नाही. माणसांनी विज्ञानाची सृष्टी घेतली; पण दृष्टी घेतली नाही. विज्ञानाची करणी स्वीकारली; पण विचारसरणी स्वीकारली नाही, अशी खंत दाभोळकर यांनी व्यक्त केली. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगते की, तपासा आणि स्वीकारा, वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला निर्भय जगण्यास शिकविते. विज्ञान हे जीवनाची दृष्टी आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, अंनिस जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर, कार्याध्यक्ष मोहन भोईर, प्रधान सचिव संदेश गायकवाड, अमित निंबाळकर, मुख्याध्यापक संदेश पिंगळे व जयवंत गुरव व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक तुरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.