murder sakal media
महाराष्ट्र बातम्या

रोहा : मालकाचा खून करून मृतदेह फेकला दरीत

दोन वर्षांपनंतर फरार आरोपी रोहा पोलिसांच्या ताब्यात

CD

रोहा : भंगारविक्री व्यवसाय मालकाकडून हीन वागणूक मिळत असल्याने संतापलेल्या नोकराने मालकाचा रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत जानेवारी २०२० मध्ये हत्या (owner murder) केली होती. त्यानंतर त्याने मृतदेह दरीत फेकून (deadbody in valley) दोन वर्षे फरार होता. अखेर या आरोपीच्या रोहा पोलिसांनी (roha police arrested culprit) मुसक्या आवळल्या आहेत. विकास महादेव चव्हाण (वय २५, रा. परांडा जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव असून तो अमित सिंग या भंगार विक्री व्यावसायिकाकडे नोकरी करत होता. सिंग यांच्याकडून सतत हीन वागणूक मिळत असल्याने विकासच्या मनात राग निर्माण झाला होता.(roha police arrested fugitive culprit in murder crime)

२८ जानेवारी २०२० रोजी रात्री ८ च्या सुमारास विकास मालक सिंगसोबत रोहा-नागोठणे रोडवरून भिसे खिंडीतून दुचाकीने जात होते. त्या वेळी सिंग लघुशंकेसाठी वाटेत थांबले असताना त्याने डोक्यात दगड मारून ठार मारले. पुरावा नष्ट करण्याचा हेतूने त्‍यांचा मृतदेह भिसे खिंडीच्या दरीत ढकलून आरोपीने तेथून पळ काढला. दोन वर्षांपासून तो फरार होता. रोहा पोलिसांना तो रोह्यात काही कामानिमित्त येणार असल्याची माहिती मिळताच गुरुवारी रात्री सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

आरोपी विकासने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात विकासविरोधात सहायक फौजदार दीपक म्हशीलकर यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे. रोहा न्यायालयाने आरोपीला सातदिवसीय पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT