Koyna Dam Electricity esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam : कोयना वीज केंद्रावर पाणीटंचाईचं सावट! धरणात वीजनिर्मितीसाठी फक्त 24 TMC पाणी शिल्लक

राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कोयना जल विद्युत केंद्रावर (Koyna Hydroelectric Project) यंदा पाणीटंचाईचे सावट आहे.

सकाळ डिजिटल टीम

यंदा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची (Rain) कमी नोंद झाल्याने तब्बल १०५ टीएमसी एवढी मोठी क्षमता असतानाही धरण केवळ ९४ टीएमसीपर्यंत भरले होते.

मुंबई : राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कोयना जल विद्युत केंद्रावर (Koyna Hydroelectric Project) यंदा पाणीटंचाईचे सावट आहे. कोयना धरण क्षेत्रात यंदा कमी पावसाची नोंदी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली असून, सध्या ६८ टीएमसी पाणी आहे, तर वीजनिर्मितीसाठीचा पाणीसाठा केवळ २४ टीएमसी आहे. मागील वर्षाचा विचार करता जवळपास सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील तीन महिने कोयनेतून (Koyna Dam) वीजनिर्मिती करताना महानिर्मितीला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

महानिर्मितीची एकूण वीजनिर्मिती क्षमता सुमारे १४ हजार मेगावॉटच्या घरात असून त्यांच्याकडून महावितरणला (Mahavitaran) सरासरी आठ-नऊ हजार मेगावॉट एवढ्या विजेचा पुरवठा केला जातो. एकट्या कोयना धरणाची वीजनिर्मिती क्षमता सुमारे १,९६० मेगावॉट एवढी आहे. त्यामधून विजेच्या मागणीनुसार १,९०० मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती करता येते, मात्र यंदा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची (Rain) कमी नोंद झाल्याने तब्बल १०५ टीएमसी एवढी मोठी क्षमता असतानाही धरण केवळ ९४ टीएमसीपर्यंत भरले होते.

तसेच एकूण क्षमतेच्या ६७.५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येते. आतापर्यंत महानिर्मितीने सुमारे ४२ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले असून सध्या वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा साठा २४ टीएमसी एवढा कमी आहे. वाढत्या तापमानामुळे पुढील तीन महिन्यांत राज्याची विजेची मागणी वाढते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा येत असल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने दिली.

कोयना वीज केंद्रातून महानिर्मितीकडून वीजनिर्मिती केली जात असली तरी कोणत्या वेळी किती वीजनिर्मिती करायची याचे नियोजन महावितरण आणि राज्य भार प्रेषण केंद्राकडून केले जाते, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणी असल्याने वीजनिर्मिती करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

-ए. डी. शिंदे, मुख्य अभियंता, कोयना वीज केंद्र

परिस्थिती बिघडण्‍याची शक्यता

राज्याच्या विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यास कोळशावरील वीज प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती वाढवता येत नाही, तेव्हा जलविद्युत प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती सुरू करून ग्रीडची स्थिरता राखली जाते, मात्र पुढील काळात कोयना धरणातच पाण्याचा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात अचानक विजेची मागणी वाढल्यास तत्काळ वीजनिर्मिती वाढवताना मर्यादा येणार आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT