Tomato price increased Vegetable market sakal
महाराष्ट्र बातम्या

Tomato Price : दरवाढीमुळं टोमॅटोची वाढली 'लाली'; किलोला मिळतोय 'इतका' भाव

टोमॅटोचे (Tomato) दर वाढल्याने टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कच्चा मालाच्या भावात वाढ झाल्याने पोह्याचे भाव ४० रुपयांवरून ५० रुपये झाले आहेत.

ओगलेवाडी : तुरीच्या उत्पन्नात घट झाल्याने बाजारपेठेत (Vegetable Market) तूरडाळीच्या भावात दीडपटीने वाढ झाली आहे. किलोचे भाव १५० रुपयांच्या दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे तूरडाळीच्या आमटीला महागाईचा तडका बसल्याची स्थिती आहे.

दरम्यान टोमॅटोचे (Tomato) दर वाढल्याने टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. गृहिणींकडून तूरडाळीऐवजी मूगडाळीचा वापर होऊ लागला आहे. खाणावळीत तुरीची आमटी कमी झाली आहे. त्याला पर्याय म्हणून भाज्या व कडधान्यांची उसळ दिली जात आहे.

कच्चा मालाच्या भावात वाढ झाल्याने पोह्याचे भाव ४० रुपयांवरून ५० रुपये झाले आहेत. चिरमुरेचे भाव किलोस १५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे भेळ व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भाजी मंडईत टोमॅटोचे भाव किलोस ५० रुपयांपर्यंत वाढल्याने टोमॅटोची लाली वाढली आहे. पाऊस लांबल्याने हिरव्या भाजी पाल्यांची आवक कमी झाली आहे.

मेथी पेंडीचा दर १५ रुपयांवरून ३० रुपये, पालक पेंडीचा भाव २० रुपये झाला आहे. हिरव्या मिरचीच्या भावात दीडपटीने वाढ झाली आहे. किलोचा भाव ८० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत वाढला आहे. कडधान्यांना मागणी वाढू लागल्याने कडधान्यांच्या भावातही किलोस २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा दुधगाव-खोची बंधारा खुला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT