Mumbai Local Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Local: २.९४ हजार पर्यटकांनी केला लोकल प्रवास; रेल्वेची पर्यटन तिकीट सुसाट !

Chinmay Jagtap

Mumbai Local: देशविदेशातून मुंबई फिरायला येणाऱ्यांना पर्यटकांना मुंबईच्या मनमुराद आनंद घेता यावा याकरिता रेल्वेकडून पर्यटक तिकीट सुरु केली आहे. गेल्या आठ महिन्यात एकूण २.९४ लाख प्रवाशांनी पर्यटन तिकिटांच्या सुविधेचा लाभ घेतला आहे. त्यातून १.१० कोटी एवढा महसूल जमा झाला आहेत.

एका तिकिटीत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर फिरता यावे म्हणून रेल्वेने २०१६ पासून पर्यटन तिकीट संकल्पना सुरु केली होती. या पर्यटकांना पश्चिम किंवा मध्य अशा कोणत्याही रेल्वेमार्गावरून एक दिवस, तीन दिवस किंवा पाच दिवसांसाठीचे पर्यटक तिकीट काढता येते.

या तिकिटावरून त्या दिवशी पूर्ण कालावधीत पर्यटकांना मुंबई उपनगरीय क्षेत्रात कुठेही आणि कितीही प्रवास करण्याची मुभा आहेत. मध्य रेल्वेच्या पर्यटन तिकिटांना प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत एकूण २.९४ लाख प्रवाशांनी पर्यटन तिकिटांच्या सुविधेचा लाभ घेतला आहे. द्वितीय श्रेणीने प्रवास करणारे २.१४ लाख पर्यटकांनी प्रवास केला. तर प्रथम श्रेणी / एसी वर्गाने प्रवास करणार् या ८० हजार १६८ पर्यटकांनी प्रवास केल्याची नोंद आहे.

एका तिकिटीत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर सहज फिरता येत असून पर्यटन तिकिट विक्री वर्षभर सुरू असते.मात्र ऐन सुटयाच्या कालावधी मध्ये या पर्यटक तिकिटांच्या खप वाढतो. या मध्ये उन्हाळी सुटय़ांपेक्षा हिवाळ्यात म्हणजेच दिवाळी आणि ख्रिसमस मध्ये या तिकीटात विक्रीत तेजी येत . दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण २.९४ लाख प्रवाशांनी पर्यटन तिकिटांच्या सुविधेचा लाभ घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT