Pune Traffic Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Traffic: मुंबई बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प; नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

वारजे, सिंहगड, भारती विद्यापीठ पोलिसांच्या वतीने वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा मोठा फटका पुण्यालाही बसला आहे. मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे. (Latest Marathi News)

नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.मुंबई बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. वारजे भागातील रस्ता मुंबई बंगळुरू महामार्गाला जाऊन मिळतो. या भागातील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक, नागरिक, विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे,आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतूककोंडीमुळे ठप्प झाले आहेत. वारजे, सिंहगड, भारती विद्यापीठ पोलिसांच्यावतीने वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.(Latest Marathi News)

मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई बंगळुरू महामार्गासह मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूर ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन मध्ये खड्ड्यामध्ये एक गाडी आदळून बंद पडली. त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT