two wheeler silencer and fancy number plate road roller Action sakal
महाराष्ट्र बातम्या

ट्राफिक पोलिसांची कारवाई! नियम मोडला की जागेवरच द्यावा लागेल रोखीने दंड; दुचाकीचे सायलेन्सर अन्‌ फॅन्सी नंबरप्लेट जागेवरच काढण्याची कारवाई

सोलापूर शहरातील रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवरील कारवाई वाहतूक पोलिसांनी तीव्र केली आहे. मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असलेल्या दुचाकी विशेषत: बुलेटवर सर्वाधिक फोकस आहे. याशिवाय फॅन्सी नंबरप्लेट लावलेल्या दुचाकीवरही कारवाई केली जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवरील कारवाई शहर वाहतूक पोलिसांनी तीव्र केली आहे. मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असलेल्या दुचाकी विशेषत: बुलेटवर सर्वाधिक कारवाईचा फोकस आहे. याशिवाय फॅन्सी नंबरप्लेट लावलेल्या किंवा नंबरप्लेट दिसणार नाही, असे काहीतरी त्यावर लिहिलेले असेल तर त्यावरही कारवाई केली जात आहे. अशा वाहनधारकांकडून पहिल्यांदा एक हजार रुपयांचा दंड भरुन घेतला जात आहे.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त अजित बोऱ्हाडे, सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनधारकांना स्वयंशिस्त लावली जात आहे. त्यासाठी तशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मागील १० महिन्यात सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर बदलणाऱ्या एक हजार ५८९ दुचाकींवर आणि फॅन्सी नंबरप्लेट लावून रस्त्यांवर धावणाऱ्या १२ हजार २१८ दुचाकीस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

सायलेन्सर व फॅन्सी नंबरप्लेटवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांना दीड कोटींचा दंड केला आहे. आता शहरातील चौकाचौकात सकाळ, दुपार व सायंकाळच्या सत्रात वाहतूक पोलिस कारवाई करीत आहेत. पूर्वीचा दंड वसूल करणे व आता नियम मोडला असल्यास तोही दंड जागेवरच भरून घेण्याची कारवाई सुरू आहे.

दंड जागेवरच भरावा लागणार

१४ डिसेंबर रोजी जिल्हाभरात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी, सोलापूर शहरातील ज्या वाहनधारकांना वाहतूक नियम मोडल्यासंदर्भात दंड लागला आहे, अशा १२ हजार वाहनधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्या वाहनांवर पूर्वीचा दंड आहे आणि आता नियम मोडल्याचा दंड, या दोन्ही दंडाची रक्कम जागेवरच भरून घेतली जात आहे. ई-चालानद्वारे दंड केल्यानंतर अनेकजण तो भरत नाहीत, त्यामुळे आता ते वाहन आढळल्यावर प्रलंबित दंड रोखीनेच भरून घेतला जात आहे. मूळ सायलेन्सरमध्ये बदल केला असल्यास नव्याने बसवलेला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर सोलापूर शहर वाहतूक पोलिस जागेवरच काढून घेत आहेत.

सर्वांनीच वाहतूक नियम पाळावेत

मूळ सायलेन्सर बदलून दुसरे मोठा आवाज येणारा सायलेन्सर बसविलेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय फॅन्सी नंबरप्लेट लावलेल्या वाहनांवरही कारवाई केली जात आहे. सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT