Trimbakeshwar Controversy
Trimbakeshwar Controversy 
महाराष्ट्र

Trimbakeshwar Controversy : हिंदू असो किंवा मुस्लीम; मंदिरात कोणालाही.....; कायदेतज्ज्ञांनी सांगितला नियम

Sandip Kapde

Trimbakeshwar Controversy : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात काही  तरुणांनी जबरदस्तीने प्रवेश केल्याची घटना समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली.

काही आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणावर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी साम टीव्हीशी बोलताना कायदेशीर नियम सांगितले आहेत.

असिम सरोदे म्हणाले, हिंदू असो, मुस्लिम असो वा ख्रिश्चन असो कुणालाही कोणत्याही मंदिरात किंवा मज्जिदमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा काही विशिष्ट प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असेल तर केवळ त्याचंवेळी तुम्हाला रोखता येतं.

विषेश काही असेल तरच ही बंधने आणली जाऊ शकतात. कोणत्याही धार्मिक स्थळांवर जाण्यासाठी कुठल्याही समाजाच्या लोकांना कोणीही रोखू शकत नाही. एखादा व्यक्ती मुस्लीम धर्माचा आहे म्हणून पोलीसांनी अटक करुन गून्हा दाखल करणे हा प्रकार देखील चुकीचा आहे. अटक करण्यासाठी पोलिसांकडे कारण असलं पाहिजे अन्यथा ही केस त्यांच्यावरही पलटू शकते, असे असिम सरोदे यांनी स्पष्ट केले.

मंदिरात नेमकं काय घडलं होत?

त्र्यंबकेश्वर येथे ३ मे रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला.या १० ते १२ युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान तेथे बंदोबस्तात असलेले एमएसएफ जवानांनी त्यांना रोखले. आपणास आत जाता येणार नाही असे सांगीतले. त्यानंतरही जवळपास १५ मिनेट त्यांची हुज्जत झाली. मात्र अखेर प्रवेश न घेता ते तेथून पुढे निघून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथे विशिष्ट धर्मातील नागरिकांकडून संदल निमित्त दरवर्षी मिरवणूक काढली जाते. ती दरवर्षी ठराविक मार्गानेच जात आली आहे. यादरम्यान यंदाच्या या मिरवणूकीतील काही तरुणांनी मंदिरात बळजबरीने जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही, असा नियम आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ याबद्दल ठळक शब्दात सूचना देखील लिहीण्यात आली आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सरोदे काय म्हणाले?

असिम सरोदे यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर देखील मत मांडले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांचा विजय झाला, अशा बातम्या देण्यात आल्या. मात्र मूळ राजकीय पक्षाने दिलेला व्हीप मानला जाईल असे कोर्टाने म्हटले आहे.

जून २०२२ रोजी अजय चौधरी यांना मान्यता देणे हे देखील सुप्रीम सांगितले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष यांचा एकनाथ शिंदे यांच्या बाबत जो निर्णय दिला तो बेकायदेशीर आहे, असे सरोदे म्हणाले.
 
असिम सरोदे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात हे स्पष्ट केला आहे की, निवडणूक आयोगाने दिलेला फायनल निर्णय हा अध्यक्षांनी परिणाम करुन घ्यायचं नाही. निवडणूक आयोगाचा निकाल बाजूला ठेवून अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT