maharashtra politics sakal
महाराष्ट्र बातम्या

ऑक्टोबरअखेर ‘मिनी मंत्रालया’चा बिगुल! आज पंचायत समिती सभातपींचे तर सोमवारी गट-गणांचे निघणार आरक्षण; शिक्षकांना जानेवारीपर्यंत इलेक्शन ड्यूटी

दिवाळीनंतर म्हणजेच २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. नगरपालिका-नगरपरिषदा व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सभापती, गट-गणांचे आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पहिल्यांदा मिनी मंत्रालयाची निवडणूक (जिल्हा परिषद व पंचायत समित्या) होईल.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. दिवाळीनंतर म्हणजेच २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. नगरपालिका-नगरपरिषदा व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सभापती, गट-गणांचे आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मिनी मंत्रालयाची निवडणूक (जिल्हा परिषद व पंचायत समित्या) होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

राज्यातील २३ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिका व २८९ नगरपालिका-नगरपरिषदांची मुदत तीन वर्षांपूर्वीच संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीअखेर पूर्ण होतील. निवडणुकीचे दोन टप्पे असतील.

दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका व महापालिकांची निवडणूक एकत्रित घेण्याचे नियोजिन आहे. तत्पूर्वी, राज्य निवडणूक आयुक्तांची सर्व विभागांचे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक होईल. त्यात निवडणुकीसाठी उपलब्ध होणारे मनुष्यबळ, स्थानिक परिस्थिती, निवडणुकीची प्रशासकीय तयारी, उपलब्ध ‘ईव्हीएम’ या बाबींची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्याची घोषणा होणार आहे. पहिल्यांदा केवळ २८९ नगरपालिका-नगरपरिषदांची निवडणूक घेण्याऐवजी राज्यातील २३ जिल्हा परिषदा व ३३१ पंचायत समित्यांचा मोठा टप्पा पार पाडण्याचे नियोजित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पंचायत समिती सभापतींचे आज तर सोमवारी गट-गणाचे आरक्षण

राज्यातील ३३१ पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे. तर सोमवारी जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांच्या गणाचे आरक्षण काढले जाणार आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबरला मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून आठ-दहा दिवसांत ती अंतिम होईल, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची घेतली जाईल माहिती

जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. शुक्रवारी (ता. १०) पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण निघेल. त्यानंतर सोमवारी (ता. १३) गट व गणांचे आरक्षण जाहीर होईल. दरम्यान, निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळाची विविध विभागांकडून माहिती घेतली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षकांसह सर्वच शासकीय-निमशासकीय विभागातील कर्मचारी असतील.

- संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी, सोलापूर

निवडणुका होणाऱ्या संस्था

  • एकूण जिल्हा परिषदा

  • २३

  • पंचायत समित्या

  • ३३१

  • महापालिका

  • २९

  • नगरपालिका-नगरपरिषदा

  • २८९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP Election : जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज; बारामती, हवेली, आंबेगावात सभापतिपदासाठी होणार चुरस

राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटाच्या पुढच्या शेड्यूलची पुण्यात आज सुरुवात, ब्लॉकबस्टर गाण्याचं शूटिंग होणार!

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात जुन्या वादातून 21 वर्षीय तरुणाची हत्या

Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण

Asian Aquatic Championship : तिरंग्याचा अपमान? जलतरणपटूंच्या पोशाखाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मागवला अहवाल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT