महाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांचे बिऱ्हाड पाठीवर ! 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे समजते. मुंढे यांच्या बदलीमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, लोकप्रतिनिधी यांनी त्यात बाज मारल्याचे दिसून येते.

स्वभाव आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचे उडणारे खटके यामुळे त्यांना कालावधीपूर्ण होण्याअगोदरच बदलीला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुंढे यांचे बिऱ्हाड कायम पाठीवर असल्याचे चित्र काही वर्षांपासून निर्माण झाले आहे. 

सनदी सेवा परीक्षेत मराठी अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची 2005 मध्ये निवड झाली. योगायोगानेच त्यांना गुणवत्तेनुसार महाराष्ट्र होम स्टेट मिळाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यापासून मागील दहा वर्षांतील मुंढे यांची कारकीर्द ही धडाकेबाज, खमक्‍या प्रशासकीय अधिकारी म्हणून गाजली आहे. मुंढे यांची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी लोकप्रतिनिधींशी उभा संघर्ष केला. त्यामुळे त्यांच्या बदल्या कालावधी पूर्ण होण्याअगोदरच झाल्या आहेत. मागील दोन-तीन वर्षांत मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्‍त, पुणे परिवहन सेवा आयुक्‍त, त्यानंतर नाशिक महापालिका आयुक्‍त म्हणून बदल्या झाल्या.

नाशिक शहरात मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे, बिल्डर लॉबी यांच्यावर कारवाईचा हात उगारला. साहजिकच सत्ताधारी भाजपचे नगरसेवकदेखील मुंढे यांच्यावर नाराज होते. वेळप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुंढे यांच्या बदलीसाठी मागणी करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT