Tunisha Sharma
Tunisha Sharma esakal
महाराष्ट्र

Tunisha Sharma : गप्प आहोत म्हणजे कमजोर नाहीत....तुनिषा प्रकरणामध्ये शीजानच्या बहिणींची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः तुनिषा आत्महत्या प्रकरणाने सध्या सीरियल इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड शीजान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शीजानच्या दोन बहिणींनी मात्र कडवट प्रतिक्रिया दिली आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं सिरियलच्या शूटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे झाले आहेत तिच्या आईच्या जबाबावरुन शीजान खानला अटक केली आहे. आता तो ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

त्यातच आता शीजान खानच्या बहिणींनी यावर प्रतिक्रिया दिलीय. अभिनेत्री फलक नाझ आणि शफक नाझने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणाल्या की, शीजान निरापराध आहे, त्याला फसवलं जात आहे.

शफक आणि फलक म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाला सध्या प्रायव्हसी पाहिजे. वेळ आल्यानंतर खरं काय ते सांगणार आहोत. आम्हाला आता वेळ द्या. लवकरच याप्रकरणी खुलसा करण्यात येईल. एक अनमोल आत्मा आपल्यातून गेल्याचं आम्हांला दुःख आहे, असं त्या म्हणाल्या.

पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, एका निरापराध मुलाला यामध्ये फसवलं जात आहे. पोलिस आपलं काम करीत आहे त्यांना ते करु द्यावं. ही वेळ आमच्या कुटुंबासाठी संकटाची आहे. आम्हाला देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु आम्ही गप्प आहोत म्हणजे कमजोर नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सगळं सांगू.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

शीजान तुनिषाबाबत अनेक गोष्टी पोलिसांना सांगत आहे. एका वृत्त संस्थेला पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीजनने आता पोलिसांना सांगितलयं की, तुनिषाने आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी शीजननेच तिला वाचवलं होतं. शीजानने सांगितले की, त्याने तुनिषाच्या आईलाही याबाबत माहिती दिली होती आणि तिची काळजी घेण्याचंही सांगितलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT