Twitter user criticize on Amruta Fadnavis related to Uddhav Thackeray criticism 
महाराष्ट्र बातम्या

'अमृता फडणवीस या आजच्या सत्तालोभी आनंदीबाई'; शिवसेनेचे प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आडनावावरून टीका केली होती. त्यांच्या या ट्विटरवरून सोशल मीडियावर त्या पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत. त्यांच्या ट्विटला एका शिवसेना नगरसेवकाने झणझणीत उत्तर दिले आहे.

'केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही.' असे अमृता म्हणाल्या होत्या. यावर ट्विटरवर शिवसेना नगरसेवक अमेय घोलेंनी रिप्लाय देत म्हणले आहे की, 'इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई' या ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे, तर अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत.

काय घडले?
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप यांच्यात सावरकर याविषयावरून ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'माफी मागायला माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे.' अशी टीका केल्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी राहुल यांना लक्ष्य केले आहे. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना, 'केवळ गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही', अशी टीका ट्विटरवरून केली. त्यांचे ट्विट रिट्विट करताना अमृता फडवणीस यांनी हाच आडनावाचा धागा पकडून, उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.  

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला रिट्विट करताना अमृता फडणवीस यांनी म्हटलंय की, देवेंद्रजी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कोणीही केवळ आपल्या नावापुढं ठाकरे आडनाव लावून ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्य, तत्वांचा अंगीकार करावा लागतो. स्वतः कुटुंबाच्या आणि वर्चस्ववादाच्या पुढं जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांच्या हिताचा विचार करावा लागतो. 

वादग्रस्त ट्विट
आरेच्या जंगलातील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेनं मेट्रो कारशेडचं काम थांबवलं होतं. तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यावरून अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. स्वर्गीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील नियोजित स्मारकाच्या कामासाठी वृक्षतोड होणार असल्याच्या एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत, अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं ट्विटवरूनच प्रत्युत्तर देऊन अमृता फडवणीस यांच्या टीकेतील हवा काढून घेतली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT