वीज बिल  ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

सव्वादोन लाख ग्राहकांकडे ४४ कोटींची थकबाकी! ‘महावितरण’कडून वसुली मोहीम, कनेक्शन तोडण्याची कारवाई; वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यावर आता थेट फौजदारी

वीज वापरानंतर ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रीडिंगसह वीजबिलाचे विवरण पाठविले जाते. शिवाय घरी बिलेही पोच केली जातात. वीज वापरूनही ग्राहक बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महावितरणला कठोर भूमिका घ्यावी लागते. वर्ष अखेरमुळे आता थकबाकी वसुलीसाठी अधिकारीही मोहिमेत सहभागी झाले आहेत. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे वीजजोड तोडले जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : मार्चअखेरमुळे महावितरणकडून वीजबिल थकबाकी वसुली मोहीम वेगाने राबविली जात आहे. वीजबिल वसुलीवेळी थकबाकीदार ग्राहक आणि महावितरणचे कर्मचारी यांच्यात वादविवादाच्या घटना घडतात. यातून थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत थकबाकीदारांची मजल जाते. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास हल्लेखोरास पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे.

अशा घटनांत महावितरणने थेट फौजदारी कारवाई केली आहे. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी नियमित प्रयत्न सुरू आहेत. आता मार्च अखेरमुळे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोहीम सुरू आहे. त्यासाठी वीजजोड तोडणी केली जात आहे. थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. मात्र, वसुली मोहिमेवेळी शिवीगाळीसह कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या आणि त्यांच्यावर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

ग्राहकांच्या दुर्लक्षामुळे अधिकारीही वसुली मोहिमेत

वीज वापरानंतर ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रीडिंगसह वीजबिलाचे विवरण पाठविले जाते. शिवाय घरी बिलेही पोच केली जातात. महिनाभर वीज वापरूनही ग्राहक बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा ग्राहकांविरोधात महावितरणला कठोर भूमिका घ्यावी लागते. वर्ष अखेरमुळे आता थकबाकी वसुलीसाठी अधिकारीही मोहिमेत सहभागी झाले आहेत. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे वीजजोड तोडले जात आहेत. या माध्यमातून थकबाकी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

यामुळे वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले

  • वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, त्यानंतरही वीजजोड तोडल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात.

  • उन्हाळ्यात सतत वीजपुरवठा खंडित होतो. त्यातून वाद होऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत घटना जातात.

  • नादुरुस्त मीटरमुळे वाढीव वीजबिले दिली जातात. यातूनही ग्राहक संतप्त होऊन कर्मचाऱ्यांना मारण्यापर्यंत मजल गाठतात.

शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

वीजबिल थकबाकी वसुली, वीजपुरवठा खंडित केल्यावर कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास संबंधित ग्राहकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा फौजदारी गुन्हा दाखल केला जातो.

ग्राहक ग्राहक संख्या थकबाकी

  • घरगुती २ लाख ८ हजार २७ ३३ कोटी १८ लाख २७ हजार

  • वाणिज्य १६ हजार ८४१ ६ कोटी ६५ लाख ४६ हजार

  • उद्योग ४ हजार ५७४ ४ कोटी ३२ लाख ८१ हजार

  • एकूण २ लाख २९ हजार ४४२ ४४ कोटी १६ लाख ५४ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा केंद्राचा निर्णय

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT