two army Jawan from Maharashtra Ganesh Kasbe and Ashok Ingwale dies  
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राचे दोन सुपुत्र जवान गणेश कसबे, अशोक इंगवले यांना वीरमरण

सकाळ डिजिटल टीम

भारतीय सैन्यात आपले कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राचे दोन सुपुत्रांना वीरमरण प्राप्त झाले आहे. यामध्ये बारामतीचे जवान अशोक बापूराव इंगवले आणि संगमनेर तालुक्यातील गणेश देवराम कसबे (ढोरवाडी) या दोन सुपुत्रांचा समावेश आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना त्यांना वीरगती प्राप्त झाली.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील सोनगाव (ता. बारामती) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले अशोक बापूराव इंगवले (वय ३१) हे मागील ७ वर्षांपासून सीआरपीएफमध्ये जवान म्हणून देशसेवा बजावत होते. यांना आज पंजाब येथे वीरमरण आले. यामुळे सोनगाव शोककुल झाले आहे. इंगवले यांचे पार्थिव मंगळवारी रात्री अथवा बुधवारी त्यांच्या मूळ गावी येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून, त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांना निवडणुकांमुळे ते पंजाबमध्ये बंदोबस्तावर असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT