Sandeep Deshpande
Sandeep Deshpande  esakal
महाराष्ट्र

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी दोघे ताब्यात; हल्ल्याचं कारण राजकीय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः काल सकाळी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. हा हल्ला नेमका का झाला? याबाबत स्पष्टता नसली तरी हल्ल्यामागचं एक कारण चर्चिलं जात आहे. शिवाय हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय.

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईतल्या भांडूप भागातून दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत.

संदीप देशपांडे हे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना एकटं पाहून तोंडावर मास्क लावलेले चौघे तिथे आले. त्यांनी संदीप यांच्यावर हल्ला सुरु केला. हातातल्या स्टंपने त्यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न झाला.

संदीप देशपांडे यांनी प्रतिकार करत आपल्या हातावर मार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार झाले.

मागच्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात घोटाळा केल्याचा आरोप असून त्यासंदर्भात संदीप देशपांडे हे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार होते. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवला आहे.

देशपांडे यांनी जबाबात काय म्हटलंय?

"मी 'महाराष्ट नवनिर्माण सेना' या पक्षाचा सरचिटणीस व प्रवक्ता आहे. मी दररोज सकाळी शिवाजीपार्क मैदानात मॉर्निंग वॉक करतो. सकाळी 6.45 वा. च्या सुमारास घरातून निघतो. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे दररोज माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला असतात. आज सकाळी 6.50 वा. च्या दरम्यान घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजीपार्क मैदानाकडे निघालो. मैदानाचे गेट नं. 5 वर पोहोचल्यावर मी घड्याळ पाहिले तेव्हा 7.00 वाजले होते. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे तोपर्यंत आले नव्हते. म्हणून मी एकट्यानेच वॉक सुरू केला. गेट नं. 5 समोर जॉगिंग ट्रॅकवर डावीकडे बळुन मी मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या दिशेने चालत गेलो. मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाचे गेट नं. 5 कडे आलो. त्यावेळी अंदाजे 7.15 वाजले असतील, गेट नं. 5 पास करून थोडा पुढे गेलो असताना कुणीतरी मागून माझ्या उजव्या पायाचे मांडीवर कोणत्यातरी टणक वस्तूने जोरात फटका मारला म्हणून मी लगेच मागे वळून पाहिले असता तीन/चार तरूण होते. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बँट होते. त्यांनी मला हातातील स्टंप व बँटने मारहाण केली. त्यांचपैकी एकजण माझे डोक्यावर बँट मारत असताना मी हात मध्ये धरला त्यामुळं मी वाचलो परंतू हातावर जोरात प्रहार झाला व मी खाली पडलो. मी पडल्यावरही त्यांनी मला स्टप व बँटने मारहाण केली. मारहाण करताना ते मला शिवीगाळ करत "तुझं खूप झालं, पत्र लिहीतोस का भडव्या? ठाकरेंना नडतोस का? वरूणला नडतोस का?" असे बोलले. ते मला मारहाण करीत असताना मॉर्निंग वॉक करणारे लोक मला सोडविण्यासाठी जवळ येत असताना त्यांनी लोकांना मोठमोठ्याने "साले कोणी मध्ये याल तर, तुम्हालाही मारून टाकु", असे बोलून आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे घाबरून मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची पळापळ झाली. भीतीने कोणी माझ्या मदतीला आले नाही. ते लोक मारहाण करून राजा बड़े चौकाच्या दिशेने पळत गेले. ते लोक गेल्यानंतर माझे मित्र ललित महाडिक व इतर लोक माझ्याजवळ आले. ललित महाडिक यांनी मला उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मला तपासुन उपचार केले. मारहाणीमध्ये माझा उजवा हात फ्रेंक्चर झाला असल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले, माझे डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली दुखापत झाली असुन, उजव्या पायावर व इतरत्र मुक्का मार लागला आहे.

मारहाण करणाऱ्या तरुणांचं वर्णनही संदीप देशपांडे यांनी आपल्या जबाबाबात दिलं असून ते पुन्हा समोर आले तर त्यांना ओळखू असंही म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT