suicide 
महाराष्ट्र बातम्या

Farmer Suicide: कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळ आणि अमरावतीच्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, मुख्यमंत्री करणार दौरा

यवतमाळ जिल्ह्यातील नारळी येथील व अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथील अशा दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले.

सकाळ डिजिटल टीम

Farmer Suicide: उमरखेड (जि. यवतमाळ) तालुक्यातील नारळी येथील संतोष माधव मखळे (वय ४०) यांनी स्वत:च्या शेतामधे आंब्याचा झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर ढाणकी येथील राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज असल्याची माहिती आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांमध्ये २०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून हा सर्व केंद्र शासनाच्या कृषी धोरणांचा परिणाम आहे. या आत्महत्या नसून प्रत्यक्ष शासन व्यवस्थेकडून झालेल्या हत्या असल्याचा आरोप करून शेतमालाला हमीभाव व यवतमाळ जिल्ह्याला विशेष दर्जा देऊन या ठिकाणी दूरगामी परिणाम देणाऱ्‍या योजना राबवण्यात याव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी केली आहे.

उद्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येत आहेत. शेतकऱ्‍यांना दिवाळीपूर्व अतिवृष्टीची आर्थिक मदत, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ आणि पन्नास हजार प्रोत्साहनपर रक्कम तसेच सोयाबीन पिकावर मर रोगामुळे बाधित शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाईसाठी भरीव मदत करावी, या मागण्यांच्या पूर्ततेची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

शेंडगावातही आत्महत्या

दर्यापूर तालुक्यातील (जि. अमरावती) कोकर्डानजीकच्या शेंडगाव येथील शेतकरी शरद विनायकराव येवले (वय ३८) यांनी कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे भाऊ, बहीण, आई असा परिवार असून ते घरातील एकटे कर्तापुरुष होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे, या चिंतेत येवले सतत असायचे. या चिंतेतूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर शेंडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT