Accident News 
महाराष्ट्र बातम्या

Accident News : उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या स्पीड बोटला अपघात!

Sandip Kapde

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. स्पीडबोट चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. मांडवा जेट्टीच्या खांबाला बोट घासली. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. 

छत्रपती संभाजीराजे आणि उदय सामंत हे सामंत गेट ऑफ इंडियावरुन मांडवा येथे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनाच्या बैठकीसाठी जात होते. मांडवा जेट्टी जवळ पोहचल्यावर बोट जेटीवर लावण्यासाठी वळवली, यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. चालकाने बोटीवर निंयत्रण मिळवून बोट सुखरूप लावली.

या अपघातानंतर पालकमंत्री उदय सामंत हे मांडवा येथे रस्तेमार्गाने गेले. त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे देखील होते.

या अपघातावर पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की ते मांडवा येथे जात होते. यावेळी सुरवातीला काय घडत आहे, याचा अंदाज आला नाही. मात्र जेव्हा बोट खांबाला जाऊन धडकली तेव्हा काहीतर भयंकर घडत असल्याचा अंदाज आला. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT