Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: मविआचे 12 ते 13 आमदार संपर्कात, खैरेंनंतर आता 'या' मंत्र्याने फोडला बॉम्ब

शिंदे गटाचे आमदार कोर्टाने बाद ठरवले तर फडणवीसांनी पुढचा प्लॅन तयार

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक नेते पक्षांतर करत होते. नेते फोडाफोडीच राजकारण सुरू झालं. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. जर शिंदे गटाचे आमदार कोर्टाने बाद ठरवले तर फडणवीसांनी पुढचा प्लॅन तयार असल्याचंही खैरे म्हणाले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा बॉम्ब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला आहे.

शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी हा धक्कादायक दावाही केला. यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही, उलट महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे.

पुढे ते म्हणाले की, महाविकास आघडीत काय आलबेल आहे ते आज पुढे आले. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का? असा उलट प्रश्नही उदय सामंत यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT