Uday Samant esakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta-Foxconn Project : ..तर हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला नसता; 'मविआ'वर टीका सामंतांनी सांगितलं कारण

'वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका.'

सकाळ डिजिटल टीम

'वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका.'

Uday Samant News : वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे वाईट होतंय, ते आमच्यामुळं आणि चांगलं घडतंय, ते तुमच्यामुळं असं होत नसतं, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी 'मविआ'वर केली. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

'मविआ'वर टीका करत सामंत म्हणाले, वाईट झालं तर आमच्यामुळं झालं. ही राजकारणातली वाईट प्रवृत्ती आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो. हा प्रोजेक्ट इथं आणण्यासाठी 8 ते 9 महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक Incentive Schemes शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवालजींशी फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण, मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचं ठरवलं.

'हा प्रकल्प गेलाय, याचं दु:ख आम्हालाही आहे'

6 महिन्यांत फक्त भेटीगाठी झाल्या. मात्र, कोणताही निर्णय होऊ शकला नाही. फॉक्सकॉन प्रकल्प येणार नाही, अशीच मविआची मानसिकता होती. मविआनं हाय पाॅवर कमिटीची मीटिंग घेतली नाही. हा 7 जानेवारी 2022 मधला अहवाल आहे. हा प्रकल्प गेलाय, याचं दु:ख आम्हालाही आहे. चांगलं झालं तर ते आमच्यामुळं झालं आणि वाईट झालं ते तुमच्यामुळं झालं ही प्रवृत्ती योग्य नाही, अशी टीका त्यांनी मविआवर केली.

'मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली असून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलंय. कंपनीला वेळेत Incentive पॅकेज दिलं गेलं असतं तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला नसता. परंतु, याचं खापर शिंदे आणि फडणवीस सरकारवर फोडलं जातंय, असा घणाघातही त्यांनी मविआवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ.. जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याचं सामंतांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT