Uday Samant Sakal
महाराष्ट्र बातम्या

Refinery Protest : आंदोलनाला बाहेरून लोकं आणली, आम्ही चर्चेसाठी तयार - उद्योगमंत्री सामंत

आंदोलनाच्या नावाखाली राजकारण होऊ नये असं मला वाटतं असं ते म्हणाले

दत्ता लवांडे

रत्नागिरी : बारसू रिफायनरी विरोधातील स्थानिकांचा विरोध वाढत असून गावकऱ्यांनी केलेले आंदोलन चिघळले आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यासाठी अश्रूधुरांचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिकही पोलिसांच्या विरोधात आक्रमक झाले असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.

"आजही शेतकऱ्यांना आमचं सांगणं आहे की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर करायला शासन तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आमच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण या ठिकाणी कोल्हापुरातीलही लोकं उपस्थित आहेत, असं राजकारण होऊ नये असं मला वाटतं." असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

काल अनेक मध्यस्थांचे मला फोन आले, मी चर्चेसाठी तयार आहे. पण सर्वांनी समन्वयाने घेतलं पाहिजे. कारण प्रकल्प अजून येणार की नाही ठरवायचं आहे. अजून तिथे प्रकल्प आला नाही पण या आधीच लोकांची माथी भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विनायक राऊत यांच्या भेटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितंल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT