uday samant press conference kokan marathi news 
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant : महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध विकास कामांना मंजुरी दिली जाईल !

Chinmay Jagtap

Uday Samant : राज्‍याचे सरकार गतिमान काम करीत आहे. महाडमधील एमआयडीसीतील प्रस्‍तावित विकासकामांना लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच वाढीव एमआयडीसीतील २० टक्के जागा लघु उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात येईल, असे आश्वासन रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाड एमआयडीसी मध्ये दिले.

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार व ग्रामपंचायतीत गेली अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामे व समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आज महाड उत्पादक संघाच्या सीईटीपीमधील सभागृहात कारखानदार व औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्या समवेत उद्योग मंत्री यांनी आढावा बैठक आयोजित केली.

या वेळी महाडचे आमदार भरत गोगावले, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, पोलिस उपअधीक्षक शंकर काळे, सीईटीपीचे अध्यक्ष अशोक तलाठी उपस्थित होते. एमआयडीसीच्या राज्यभरातील ३४७ कर्मचाऱ्यांपैकी ३१६ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले असून उर्वरित ३१ कर्मचाऱ्यांना कायम सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच पॅकेज दिले जाईल, असे त्‍यांनी स्पष्ट केले.

महाड येथील वाढीव एमआयडीसीला काही गामस्‍थांकडून विरोध होत आहे. त्‍यामुळे या क्षेत्रात प्रदूषित कंपन्या न आणता ग्रीन झोनमधील कारखाने आणले जातील आणि लघु उद्योजकांसाठी जागा राखीव ठेवण्यात येईल, असे त्‍यांनी नमूद केले.

बैठकीत आमदार भरत गोगावले यांनी, ग्रामपंचायती व कारखानदारांचे प्रश्न मांडले. बारसगाव ते आमशेत पर्यायी रस्ता व पूल व्हावा, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण व्हावे, बंद असलेल्या कारखाने, एमआयडीसीच्या सांडपाण्यामुळे ज्या गावांचे पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत, त्यांना मोफत पाणीपुरवठा तसेच औद्योगिक क्षेत्रातील इतर अडचणी मांडल्या. या समस्यांबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील सर्व समस्यांची सोडवणूक केली जाईल व विकास कामाला मंजुरी दिली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

महिला उद्योजकांना प्रोत्‍साहन

पुणे येथील उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीचे उदाहरण देत, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिला उद्योजकांना प्रोत्‍साहन देण्याचा तसेच त्‍यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे संकल्प केला आहे. त्यामुळे कारखानदारांनी महिलांना नोकरी देताना अटी व शर्ती ठेवू नये, अशा सूचना त्‍यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT