Waghnakh Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

वाघनखं खरी की खोटी? उदयनराजेंनी राजवाड्यातील मोठ्या चोरीचा सांगितला इतिहास, नेमकं काय घडलं?

वाघनखं (Waghnakh) खरी की खोटी, याबाबत त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता.

सकाळ डिजिटल टीम

मुळात वाघनखं ज्यावेळी होती, त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे तर मला हा प्रश्न विचारून उपयोग नाही.

सातारा : वाघनखं (Waghnakh) खरी की खोटी, याबाबत त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे हा प्रश्न मला विचारून उपयोग नाही, असे विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषदेत वाघनखांबाबतच्या विचारलेल्या प्रश्नावर केले.

दरम्यान, राज्याच्या कारभारात संपूर्ण लोकांचा सहभाग असावा, अशी संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी प्रत्येक वेळेस तारीख, तिथीबाबत वाद का निर्माण केला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वाघनखं कोणती खरी? ती चोरीला गेली होती. तीच ही आहेत का? असे विचारले. त्यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. पूर्वी आमच्या या राजवाड्यात फार कमी लोक राहात असत. आम्ही सर्वजण अदालतवाड्यात राहात होतो. त्यावेळी राजवाड्यात मोठी चोरी झाली होती.

सोन्याचे देव तसेच इतर ऐतिहासिक ऐवज असे सर्व चोरीला गेले होते. त्यावेळी आजूबाजूला वस्ती नव्हती, आता ती वाढली आहे. या वाघनखांबाबत काही जणांकडे ऐतिहासिक दाखले असतील. त्याबाबत विश्‍वासार्हता असल्याशिवाय ही लोक तसेच विधान करणार नाहीत. मुळात वाघनखं ज्यावेळी होती, त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे तर मला हा प्रश्न विचारून उपयोग नाही. मला माहीतच नाही.’’

इतिहास संशोधक अनेक दावे करत आहेत, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘आपण देव बघितलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभारात संपूर्ण लोकांचा सहभाग असावा, अशी संकल्पना मांडली होती. त्यांच्याबाबत प्रत्येक वेळेस तारीख, तिथीबाबत वाद का निर्माण केला जातो? असा प्रश्न त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT