Bhagat Singh Koshyari vs Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल, तर त्यांनी दुसऱ्या राज्यात जावं; उदयनराजेंचा इशारा

राज्यपाल कोश्यारी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळं अडचणीत सापडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल कोश्यारी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळं अडचणीत सापडले आहेत.

सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळं अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राज्यपाल बोलताना म्हणाले होते, ‘गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबई (Mumbai) आणि ठाणे शहरातून हाकलून दिल्यास इथे काहीही शिल्लक राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानी असल्याचा टॅगही मुंबईतून हिसकावण्यात येईल.’ आता या वक्तव्यावर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राने (Maharashtra) देशाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकंच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलीय.

अपमानजनक वक्तव्यानंतर राज्यपालांकडून सारवासारव

मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर राज्यपालांनी सारवासारव केलीय. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान असल्याचं त्यांनी म्हटलंय. यानंतर आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र किंवा मराठी व्यक्तीचा अपमान होणार नाही, अशाप्रकारचे स्पष्टीकरण दिलं मात्र त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह विविध नेत्यांनी कोश्यारींच्या वक्तव्यावर टीका केली. तर उदयनराजे भोसले यांनी तर दुसऱ्या राज्यात जावे, असा संताप व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT