Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असे काही...उदयनराजेंची प्रतिक्रिया

उदयनराजेंची राज्यातील सद्यःस्थितीवर दिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही? यावरुन सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असे काही वाटत नसल्याचे उदयनराजे म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Udayanraje Bhosale Says Nothing Is Shocking In Maharashtra Politics)

गेल्या दोन वर्षांपासून ही खदखद चालूच होती. मुळात आपण लक्षात घेतल पाहिजे. ज्यावेळेस एका विचाराने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कुठल्या ताकदीची, आमिष दाखवण्याची गरज नाही. पण ज्यावेळी लोक सत्ता स्थापन करण्यासाठी जातात, वेगवेगळ्या विचारांचे लोक, पक्ष जेव्हा एकत्र येतात, केवळ त्यांच उद्दिष्ट काय असत - सत्ता स्थापन करण हे असते. सत्ता स्थापन त्यांनी केली. विचारसरणी वेगळी असल्यामुळे या लोकांना एकत्र ठेवणं तारेवरची कसरत करावी लागली, असे उदयनराजे भोसले म्हणाले. ती वेगवेगळ्या विचाराचे असल्यामुळे फार काळ एकत्र राहत नाही. आणि त्यातूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

खरतर ही लोक ज्यावेळेस एकत्र आली होती. त्यावेळस विचार करायला हवा होता, की हे किती दिवस टिकणार? लोक आज बोलवून दाखवतात लोकांना पक्षश्रेष्ठींकडून वेळ दिला जात नाही. त्याच बरोबर तुमचे कामं होत नाही. मग अस होत असताना आज आमदार, खासदारकीचा पाच वर्षांचा कालावधी असतो. स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचा कालावधी संपला आहे. या दोन-चार महिन्यात सर्वांना सामोरे जावे लागेल. मग अशा वेळेस विचार केल्यास शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मतदारसंघातील विरोधक राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. त्यामुळे ही समीकरणे जुळवली गेली आहेत, असे भोसले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT