Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

'मला माढाच मतदारसंघ द्या, उदयनराजेंनीच सातारा लोकसभेची निवडणूक लढवावी'

उमेश बांबरे

भाजप नेत्यानं खासदार रणजितसिंह हे पुढच्यावेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती.

फलटण सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना दुखावण्याचा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांचा कोणताही हेतू नव्हता व आगामी काळातही नसेल. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उदयनराजे भोसले यांनीच सातारा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी. भारतीय जनता पार्टीला जर पुन्हा मला संधी द्यायची असेल तर त्यांनी माढा मतदारसंघातूनच (Madha constituency) द्यावी, असं स्पष्टीकरण भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी दिले.

फलटण (Phaltan) येथे झालेल्या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी चेस्टा मस्करीत केलेल्या विधानाचा विपर्यास झाला आहे, असं सांगून खासदार रणजितसिंह म्हणाले, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व सातारा हे एक वेगळंच समीकरण आहे. आगामी काळात सुद्धा तेच समीकरण बरकरार राहिल. सातारा लोकसभा मतदारसंघामधून उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देण्यात यावी. भारतीय जनता पक्षाला जर खासदारकीसाठी माझा पुन्हा विचार करायचा असेल तर, तो माढा लोकसभा मतदारसंघासाठीच करावा, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

खासदार उदयनराजे आणि मी जवळचे मित्र आहोत. उदयनराजे यांची जागा मी कधीही घेऊ शकत नाही. विक्रम पावसकर यांनी केलेल्या विधानाने उदयनराजे भोसले यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता व आगामी काळात सुद्धा नसेल. उदयनराजे भोसले हे अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व असून त्यांचा स्वभाव सुद्धा दिलदार आहे. उदयनराजे हे माझ्या पाठीशी कायमच ठामपणे उभे आहेत. मी केलेल्या कोणत्याही संघर्षात मग अगदी तो नीरा देवधरचा संघर्ष असला तरी ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी कधीही मागे पुढे सुध्दा बघितले नाही. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत उदयनराजे भोसले यांनीच सातारा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, असं त्यांनी शेवटी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT