uddhav thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंच्या दंगलीच्या विधानाचा राम मंदिराच्या पुजाऱ्याकडून समाचार; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः रविवारी उद्धव ठाकरे जळगावमध्ये होते. तिथे बोलताना त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दंगली घडतील अन् त्यावर भाजप राजकीय पोळी भाजून घेईल, असं विधान केलं होतं. त्याला अयोध्येतील पुजाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे.

जळगावमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, या देशामध्ये पुन्हा गोध्रो होण्याची भीती आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून हिंदू अयोध्येत जातील. उद्घाटनानंतर माघारी येत असताना एखाद्या शहरात, किंवा वस्तीमध्ये दंगली घडवल्या जातील. जोळपोळ होईल, घरांवर हल्ले होतील आणि हे लोक राजकीय पोळी भाजून घेतील, असा आरोप ठाकरेंनी केला होता.

त्यांच्या या आरोपांना राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आचार्य दास हे 'टीव्ही ९ भारतवर्ष'शी बोलत होते. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. अयोध्येमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुणी काहीच करु शकणार नाही.

आचार्य दास पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे, प्रशांत भूषण आणि सतपाल मलिक हे भीती पसरवण्याचं काम करीत आहेत. भाजप आणि आरएसएस दंगली घडवून आणेल, असं ते म्हणत आहेत. मात्र अयोध्येत इतकी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय की, कुणी पानसुद्धा हलवू शकणार नाही.

आचार्य दास यांनी उद्धव ठाकरेंच्या जळगावमधील विधानाचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे, प्रशांत भूषण आणि सतपाल मलिक हे तीन नेते दंगल भडकवतील, अशी भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. मात्र सुरक्षा व्यवस्था तैनात आहे सगळं व्यवस्थित पार पडेल, असा विश्वास दास यांनी बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT