Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: 'दादा, तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल..?'

उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवरुन शिंदे फडणवीसांना मारली कोपरखळी

सकाळ डिजिटल टीम

महाविकासआघाडीने घेतलेली पत्रकार परिषद सध्या चर्चेत आली आहे. परिषदेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरुन शिंदे फडणवीस यांना मारलेली कोपरखळी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.(Uddhav Thackeray Ajit Pawar Dada where would you like to pull the mic from Eknath Shinde Devendra Fadnavis)

काल महाविकासआघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार त्या ठिकाणी एकत्र आले. त्यावेळी बसताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना खुर्चीवर बसताना “दादा तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल” असा मिश्किल सवाल केला.

त्यांचा हात व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच, त्यांच्या व्हिडीओसोबत शिंदे फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सत्तांतरानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेना प्रश्न विचारला की शिवसेनेचे नेते संतोष बांगर कोणत्या पक्षातून तुमच्या गटात आले आहेत? तेव्हा एकनाथ शिंदे गांगरले. त्यांना काय उत्तर द्यावे ते कळेना. ते म्हणाले, "कुठल्या म्हणजे? शिवसेनेतून आलेत ना." त्याचं हे उत्तर पूर्ण होण्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून माईक हिसकावून घेतला आणि हसत उत्तर दिलं, "ते शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेत आले आहेत. आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते."

उत्तर दिल्यानंतर त्यांनी माईक पुन्हा एकनाथ शिंदेंकडे दिला. मात्र तेव्हापर्यंत एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT