Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई – शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचे १२ खासदार भाजपच्या बाजुने जाण्याची शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी आपला ठाकरी बाणा दाखवत बंडखोरांसह भाजपला कडक शब्दात ठणकावलं आहे. उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav Thackeray News in Marathi)

यावेळी उद्धव म्हणाले की, शिवसेनेत फूट बंडखोरांनी नाही तर भाजपने पाडली. भाजपच सेनेला संपवत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र एक लक्षात ठेवा, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळालात तरी धनुष्य माझ्याकडे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह बंडखोरांना इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दोन कोंबड्यांची झुंज लावण्याचं काम भाजप करत आहे. मात्र तुम्ही काहीही केलं तर लोक माझ्यासोबत आहे. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, संघर्ष करू आणि शिवसेना पुन्हा उभी करू, असं उध्दव यांनी म्हटलं.

दुसरीकडे शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ खासदारांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT