Uddhav Thackeray Eknath Shinde and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: पुन्हा आले अन् दीड दिवसांत गेले; ठाकरेंकडून शिंदेंसह फडणवीसही पट्ट्यावर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बहुचर्चित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर पहिल्या शब्दापासून हल्लाबोल चढवला. उद्धव यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला गद्दार म्हटलं. त्याचवेळी त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray news in Marathi)

उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस म्हणतात की, कायद्याच्या चौकटीत राहून बोला. अन्यथा कायदा आपलं काम करेल. हे पुन्हा आले आणि दीड दिवसांत परत गेले. फडणवीसजी तुम्हालाच कायदा कळतो असे नाही. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही गुरं पाळायची असे चालणार नाही, असा खोचक टोलाही उद्धव यांनी फडणवीसांना लगावला.

चुनचुनके मारेंगे ही काय कायद्याची भाषा आहे का, आमच्यापैकी कुणी काही बोललं की लगेच त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, लगेच आदेश द्यायचे.... अनेकांच्या केसेस काढता. तुम्ही काय सलूनचं दुकाण टाकलं का, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

उद्धव म्हणाले की, ज्यांना आपण मंत्रीपदं दिलीत, ज्यांना दिलं ते नाराज झाले. पण ज्यांना मी काही देऊ शकलो नाही ते आजही माझ्यासोबत आहेत. शिवसेना एकट्याची नाही...तुम्ही जेव्हा सांगाल मला की तुम्ही जावा मी जाईल. पण हे गद्दारांनी सांगायला नको, असंही उद्धव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

SCROLL FOR NEXT