Uddhav Thackeray Pune Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray Birthday: पुण्यात महाआरती तर 'मातोश्री'समोर शिवसैनिकांची गर्दी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आज पुण्यात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेवरचं राजकीय फुटीचं संकट दूर व्हावं, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त सारसबाग गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेनेवरचं राजकीय फूटीचं संकट दूर व्हावं, तसंच उद्धव साहेबांना दिर्घायुष्य लाभावं, यासाठी बाप्पाला साकडं घालण्यात आलं. मातोश्रीवरही रात्री बारा वाजता केक कापून उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

दरम्यान, शिवसेनेतले बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात. यामध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

उद्धव ठाकरेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांना आवाहन केलं होतं. भेटी, पुष्पगुच्छ न देता निष्ठेचं शपथपत्र द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. कुणी उद्धव ठाकरेंसाठी जालन्याहून पायी आलं आहे. तर कुणी रक्ताने त्यांचे स्केच बनवून आपली निष्ठा आणि सोबत असल्याची ग्वाही देत शुभेच्छा देण्यासाठी आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT