Uddhav Thackeray EKnath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

'शिवसेना पक्षप्रमुख' उल्लेख टाळत CM शिंदेंनी ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बंडानंतर शिंदे ठाकरे समोरासमोर येणार का, त्यांच्यातलं वितुष्ट दूर होणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडामुळे झालेल्या दुःखाचं आणि राजकीय संकटाचं सावट या वाढदिवसावर आहे. अशातच आता बंडखोरांचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंता उल्लेख 'शिवसेना पक्षप्रमुख' असा न करता 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री' असा केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची रीघ लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी केक कापत आपला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी मातोश्रीबाहेर असलेला फुलांनी सजवलेला धनुष्यबाण विशेष लक्षवेधी ठरत आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी यापूर्वी आवाहन केलं होतं की, आपल्या वाढदिवसानिमित्त भेटी, पुष्पगुच्छ न देता प्रतिज्ञापत्र द्यावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal : सत्ता मिळाली, पण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार का? महायुतीसमोर खरी कसोटी सुरू!

Pune News: पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला आलिशान गाड्या; महापौर, उपमहापौरांसह समिती अध्यक्षांसाठी महापालिकेकडून २८ वाहनांची खरेदी!

Zilla Parishad Election Pune Crime : पुणे येथील अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर जिवघेणा हल्ला, पोलिस बंदोबस्त वाढवला

ZP Elections 2026 Voting Live Update : लातूरमध्ये बोहल्यावर चढण्या आधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

SCROLL FOR NEXT