Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे परत येणार? आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय बदलला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अर्ध्याहून अधिक शिवसेना आमदार घेऊन बंड पुकारलं होतं. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठीचा वर्षा बंगला देखील सोडला. सरकार अल्पमतात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तसेच विधान परिषद सदस्यात्वाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलला आहे. (Uddhav Thackeray News In Marathi)

उद्धव ठाकरे यांनी बदलेल्या निर्णयामुळे ते पुन्हा परत येणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिल्याचं समजत.

उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. त्यांनी यापूर्वी एकही निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच, त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ते पक्षसंघटनेकडे लक्ष केंद्रीत करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यांनी आपला निर्णय बदलला असून ते विधान परिषदेतून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडे- सी व्होटरच्या सर्व्हेत भाजप-शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तर तिकडे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून संबोधलं होतं. यावरून शिंदे गटात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; अनेक कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT