MVA Uddhav Thackeray Chandrakant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "कष्ट ठाकरेंचे फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचा," महाविकास आघाडीत चंद्रकांत पाटलांनी टाकली ठिणगी

Chandrakant Patil On MVA: दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत त्यांनी 17 जागा लढवत 13 जागांवर विजय मिळवला.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपसह महायुतीचा धुव्वा उडवला आहे. महाविकास आघाडीच्या या यशामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या सांघिक कमागिरीचा मोठा वाटा होता.

अशात भाजपचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, उद्धव ठाकरेंनी कष्ट घेतले आणि फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचा झाला, असे म्हणत महाविकास आघाडीत ठिणगी टाकली आहे. पाटील यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल हे पाहणे औत्सुकाचे ठरेल.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदाच्या लोकसबा निवडणुकीत तब्बेत बरी नसतानाही उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर प्रचार केला. आपल्या पक्षाच्या 9 जागाही निवडून आणल्या.

"ठाकरे यांनी निवडणुकीच्या दरम्यान राज्यभर जोरदार प्रचार केला. त्यामुळे त्यांचे 9 उमेदवार विजयी झाले. इतकेच नव्हे तर ठाकरेंच्या प्रयत्नांमुळेच काँग्रेस आणि शरद पावर यांच्या राष्ट्रावादीला इतक्या जागा मिळवा आल्या. अन्यथा त्यांना आज घरी बसावे लागले असते."

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत त्यांनी 17 जागा लढवत 13 जागांवर विजय मिळवला. तर त्यांचे सांगलीचे बंडखोर उमेदावार विशाल पाटील यांनी विजयी झाल्यानंतर काँग्रेसला पाठींबा दिला आहे.

या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी 9 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले आहे. यामध्ये भाजपची गेल्या निवडणुकीतील 23 जागांवरून 9 जागांवर घसरण झाली आहे.

दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही पक्ष फुल्यानंतरही दमदार कामगिरी करत लढवलेल्या 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रावादीने या निवडणुकीत 4 जागा लढवल्या. त्यापैकी त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील टतकरेंच्या रूपाने रायगडची एकमेव जागा जिंकता आली.

तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 13 जागा लढवत 7 जागांवर विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT