uddhav thackeray congratulate pm modi for victory of bjp in gujarat assembly election  e sakal
महाराष्ट्र बातम्या

Gujrat Election Result 2022 : चक्क उद्धव ठाकरेंकडून मोदींचं अभिनंदन!, म्हणाले…

Komal Jadhav (कोमल जाधव)

आज जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपाचा विजय निश्चित झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय मिळवला आहे. गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे… हे अभिनंदनपर शब्द आहेत खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे… होय… उद्धव ठाकरेंनी गुजरातच्या निकालानंतर भाजपा आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.

गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे… हे अभिनंदनपर शब्द आहेत खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे… होय… उद्धव ठाकरेंनी गुजरातच्या निकालानंतर भाजप आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.

गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधान सभेचे निकाल लागले आणि तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. तर दिल्ली 'मनपा ' निवडणुकीत 'आप'ने भाजपवर मात केली. याबद्दलही ठाकरेंनी काँग्रेस आणि आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

उद्धव ठाकरेंनी भाजपचं कौतुक करताना काय म्हटलंय?

'‘गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते. पंतप्रधान मोदी हे ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. आपने गुजरातेत मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते.'' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि मोदींचं खास आपल्या शैलीत कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT