Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : घोडेबाजारातून सत्तेत येणाऱ्यांविरोधात वापरावी बाळासाहेबांची 'ती' योजना; ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

रोहित कणसे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अमरावती येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं असून देशात राईट टू रिकॉल अधिकारावर चर्चा झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. मी सभांसाठी नव्हे तर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरतोय असेही देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना नाव माझच राहणार

पक्षाचं नाव बदलणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही. त्यांना तो अधिकारच नाही असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या सगळेजण पाहत आहेत, राजकारणात पक्ष फोडणे ही गोष्ट नवी नव्हती. पण आता लोक पक्ष चोरत आहेत. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलं होतं.

ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही. नाव देणं हा निवडणूक आयोगाचा आधिकारच नाही. निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाचं नाव माझंच आहे आणि ते माझ्याकडेच राहील असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडुकांदरम्यान नियमांचं पालन होतंय की नाही ते पाहणं त्यांचं काम आहे. पक्षाचं नाव बदलण्याचा त्यांना अधिकार नाही असेही ठाकरे यांनी ठणकावले.

'राईट टू रिकॉल'

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, पुर्वी सरकार मतपेटीतून जन्माला येत असे मात्र हल्ली सरकार खोक्यातून जन्माला येत आहे. तुम्ही मतदान कोणालाही करा सरकार माझंच येईल असं बोलायला लागले आणि तसा जर पायंडा पडला तर उद्या जो कोणी दमदाट्या किंवा पैशाचा खेळ करू शकतो तो राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो.

म्हणूनच शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा 'राइट टू रिकॉल' योजना मांडली आहे. मी निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींनी चुक केली असेल, आमच्यासह जो कोणी करेल त्यांना परत बोलवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे का यावर देशात विचार व्हायला पाहिजे असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

कुणाच्या खांद्यावर....

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना ठाकरे म्हणाले की, सध्या मी मुख्यमंत्री नाहीये, त्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही. पण काल सामना पिक्चरमधील गाणं आठवलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT