Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

..यात माझाही दोष, अशी कबुली देत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

संस्था निर्माण करा,सहकारात या असे सांगत उध्दव ठाकरे यांनी गावा गावात पक्ष मजबूत करण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना दिले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सत्तेत आहोत संधीच सोनं करुन घ्या. प्रतिस्पर्धी,सोबतचे पक्ष लहान लहान निवडणुक जीव ओतून लढतात. आपण,त्याकडे दुर्लक्ष करतो. एकहाती, दोन हाती सत्ता आणायची तर फक्त बेडकी फुगवून चालणार नाही त्यासाठी हातात बळ हवे. आता प्रत्येक निवडणुक जिंकायचीच, असे आदेशच रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिले. संस्था निर्माण करा,सहकारात या असे सांगत उध्दव ठाकरे यांनी गावा गावात पक्ष मजबूत करण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना दिले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला.काही दिवसांपुर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे म्हणाले, ‘आपल्याला यावेळी पुर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहे. पण, आपण चौथ्या स्थानावर आहोत’ अशी नाखुशीही ठाकरे यांनी व्यक्त केली. आपण आता सत्तेत आहोत त्या संधीचे सोने करुन घ्या.गावा,गावात संस्था निर्माण करा.सहकारात या असे आदेशच ठाकरे यांनी दिले.

आपला विरोधी पक्ष,सोबतचे पक्ष लहान लहान निवडणुकाही ताकदिने लढतात.आपलं त्याकडे दुर्लक्ष होते.नेतेही त्याकडे जास्त लक्ष देत नाही.यात माझाही दोष आहे.अशी कबुली देत ठाकरे पुढे म्हणाले,‘आपण फक्त लोकसभा,विधानसभा निवडणुकांवर लक्ष देतो.पण,आता बँकापासून ग्राम पंचायती पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या.

निकालाच्या दिवशी दांडी गुल

मतदानाच्या संध्याकाळ पर्यंत आपला उमेदवार जिंकण्याचा आत्मविश्‍वास असतो.पण,मतमोजणीच्या दिवशी दांडी उडालेली असते.मग,याने त्याने गद्दारी केल्याचे सांगितले जाते.आता असे करायचे करायचे नाही.प्रत्येक निवडणुक जिद्दीने लढायची असेही ठाकरे यांनी नमुद केले.

पक्षातून निघून जा

विधानपरीषदेच्या दोन जागा आपण गमावल्या. त्यावेळी आपल्याच लोकांनी गद्दारी केल्याचे सांगितले. आता अशी गद्दारी करणारे पक्षात नसतील, अशी खात्री आहे. तरीही जे कोणी असतील त्यांना थेट पक्षातून निघून जावे. अगदी मुठभर शिवसैनिक राहीले तरी आपण पक्ष वाढवू शकतो, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Customs Rule: सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल! महसूल विभागाची महत्त्वाची घोषणा, कधीपासून लागू होणार?

Uttar Pradesh : CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार उत्तराखंड मोहोत्सवाचे उद्घाटन, महामंडळ सदस्यांनी घेतली भेट 

ORS Real Vs Fake: ORS खरे आहे की बनावट? जाणून घ्या 'या' सोप्या पद्धतीने!

बॉलिवूड गाजवलेल्या 'या' अभिनेत्रीच्या पालक आणि भावाची नातेवाईकांनीच केलेली हत्या ! हालअपेष्टांनी वेढलेलं आयुष्य

Ambad News: अंबडमध्ये दुमजली इमारत कोसळली; दोनजण जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT