Thackeray Group 
महाराष्ट्र बातम्या

Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या आधीच झाली ठाकरेंच्या खास माणसाची चौकशी; वाचा काय आहे प्रकरण ?

सकाळ डिजिटल टीम

Dasra Melava: उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. जोगेश्वरी पालिका भूखंड आणि पंचतारांकित हॉटेलचा समावेश असलेल्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी वायकर यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार वायकर सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले.

वायकर यांनी फसवणूक करून मुंबई महापालिकेकडून बागेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाची मंजुरी मिळवल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे त्यांनी पालिकेचे नुकसान केल्याचाही आरोप आहे.

संबंधित प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच पालिकेच्या उद्यान आणि इमारत प्रस्ताव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने हॉटेलला बेकायदा मान्यता दिल्याचा आरोप आहे.

वायकर यांनी यापूर्वी सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले होते. आपल्याकडे भूखंडाची सर्व कायदेशीर कागदपत्रे असून कोणत्याही नियमाचे किंवा कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

यंदाच्या वर्षी मार्चमध्ये किरीट सोमय्या यांनी कथित घोटाळ्याबद्दल आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशीसाठी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT