Uddhav Thackeray, devendra Fadnavis and Sambhaji Bhide 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : भिडेंच्या वादग्रस्त विधानावरून ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले, गुरुजी...

रवींद्र देशमुख

मुंबई - संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राज्यभरात भिडेंच्या विधानांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे आज विधान भवनात उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसेच नितीन असं काही करतील वाटलं नव्हतं. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नव्हतं, असंही ते म्हणाले.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले की, संभाजी भिडेंवर सरकारने बोलायला पाहिजे. ते जर भिडेंना गुरुजी मानत असतील तर सगळ बरोबर आहे, असच समजाव लागेल, असा टोला फडणवीसांना लगावला. मात्र गुरुजींनी चांगले धडे द्यावेत. तसेच इतिहास उगळून काही फायदा नाही. केवळ भविष्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी हे सुरू असल्याचही उद्धव ठाकरे म्हणाले. फडणवीसांनी आज सभागृहात संभाजी भिडे यांचा गुरुजी म्हणून उल्लेख केला होता.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात बोलू दिलं जात नसल्यावर भाष्य केलं. सभागृहात बोलू दिले जात नाही, एवढा विचारात बदल व्हावा, असं म्हणत, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं नाव न घेता टोला लगावला. तसेच अशी कृती करणाऱ्या गोऱ्हे पहिल्या महिला सभापती असतील, असही ते म्हणाले.

मणिपूर आणि नूंहमधील हिंसेवर उद्धव ठाकरे म्हणाले की, मणिपूरमध्ये सरकार आहे की नाही? राज्यपाल महिला आहेत. तरी महिलांसोबत अस होत, यावर माझ्याकडे शब्द नाहीत. डबल इंजिन सरकार आहे कुठे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT