महाराष्ट्र

Uddhav Thackeray : 'नाही रे बाबा मी त्यांचा बाप नाही, अशी घाणेरडी औलाद...'; उद्धव ठाकरेंची सणसणीत टीका

सकाळ डिजिटल टीम

जळगावः शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जळगावातल्या पाचोरा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेबाबत शिंदे गटाचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर ठाकरे गटाने चोख प्रत्युत्तर दिल होतं. त्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तरुण मुलं आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. तरीही राज्याचे नाथ बांधावर यायला तयार नाहीत. बहिणाबाईंनी एक कविता केली होती. इमानाले इसरला त्याला नेक म्हणून नये, जो जन्मदात्याला इसरला त्याला लेक म्हणू नये... असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं.

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आलो त्यावेळी तुम्ही कोण आला रे कोण आला गद्दारांचा बाप आला, अशा घोषणा दिल्या. परंतु मला लाज वाटली याची.. नाही रे बाबा मी त्यांचा बाप अजिबात नाही, ही अशी घाणेरडी औलाद आपली असू शकत नाही.. पाठीवरती सोडच पण आईच्या कुशीवरती वार करणारी गद्दारांची औलाद ही आमची असू शकत नाही, असं म्हणून त्यांनी शिंदे गटावर आसूड ओढला.

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तर ते देखील सांगतील पण आमच्याकडील मोतीबींदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही.

यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांना देखील टोला लगवाला आहे. सभेत घुसणार? म्हणतात. अशा घुशी आम्हीं खुप पाहिल्या आहेत. घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT