Uddhav Thackeray in Irshalwadi 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray in Irshalwadi: "मला राजकारण करायचे नाही, पण..." इर्शाळवाडीतील घटनेवर उद्धव ठाकरेंनी दिला सरकारला सल्ला

Sandip Kapde

Uddhav Thackeray in Irshalwadi: उद्धव ठाकरे यांनी आज इर्शाळवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांशी भेट घेतली. इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे संपूर्ण वाडी नष्ट झाली आहे. आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डोंगरामधील वस्त्यांचं सुरक्षित पुनर्वसन करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. अशा घटना दरवर्षी घडतात. मात्र त्यानंतर आपण जागे होतो. राजकारणी म्हणून सर्वांना ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आज देखील महाराष्ट्रात अशा अनेक वस्त्या ज्या डोंगरावर किंवा उताराच्या खालती आहेत, तिथे अशा घटना घडतात.  (Uddhav Thackeray in Irshalwadi)

सर्व पक्षांनी एकत्र यावे -

मला राजकारण करायचे नाही. पण मला सांगायचे आहे. सर्व पक्षांनी याबाबतीत एकत्र यायला पाहीजे. आज मला एक प्रश्न विचारण्यात आला. ज्याचे उत्तर माझ्याकडे नाही. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष होऊन सुद्धा आदिवासी बांधवांना अशाप्रकारे जगावे लागते. कोसळती दरड कधी अंगार येईल हे त्यांना सांगता येत नाही. याबाबत योजना करायला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

राज्यातील अशा वस्त्यांचे  पुनर्वसन  केले गेले पाहिजे. सरकार कुणाचे येवो. या योजनेला स्थगिती द्यायला नको. मी तरळे येथे देखील झालेल्या उपाय योजनांची चौकशी करणार आहे. किती लोकांचे पुनर्वसन, किती लोकांना घरे मिळाली, याबाबत माहिती घेणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. 

लाज वाटायला पाहिजे-

इर्शाळवाडीतील घटनेत अनेक मुले, कुणाचे आई-वडील गेले आहेत. घरातील कर्ते माणसे गेल आहेत. घरावरचे छत देखील गेले आहेत आणि राजकारणी म्हणून आपण यांच्याकडे मत मागायला जातो. आपल्याला लाज वाटायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोठी योजना राबवावी-

उद्धव ठाकरे म्हणाले, या लोकांसाठी मोठी योजना राबवावी, पंतप्रधान आवास योजनेसारखी योजना जाहीर करावी, तातडीने ही योजना आखली गेली पाहीजे. सरकार बदलले तरी यात खंड येऊ नये. मला यात राजकारण करता येणार नाही. डोंगरामधील वस्त्यांचं सुरक्षित पुनर्वसन करावे. त्यांना चांगलं आयुष्य जगता आलं पाहीजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

अवघ्या १० मिनिटांचं अंतर तरीही आईवडिलांपासून दूर राहते वैदेही परशुरामी; कारण सांगत म्हणाली- अनेक नातेवाईकांनी त्यांना...

Latest Marathi News Live Update : पाटणबोरीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नालीत आढळला मृतदेह

Pune News : चांदणी चौकातून कोथरूडच्या मार्गावर बसेस, जड वाहनांना बंदी; डुक्कर खिंड, वारजे जंक्शनमार्गे पर्यायी वाहतूक

Dr. Neelam Gorhe : मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे; मुलगा-मुलगी समानतेसाठी संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन करण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT