Narayan Rane Slams Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली...", नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार; राजकारण पेटणार?

Narayan Rane: नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा मनोहर जोशी यांच्यानंतर बाळासाहेबांनी राणेंना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती.

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्रात दोन माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शिवसेना सोडल्यापासून राणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर ठाकरेही त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राणेंना प्रत्युत्तर देत असतात.

आशात आता नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. कारण राणे यांनी, बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली असे वक्तव्य केले आहे. राणेंच्या या टीकेला ठाकरेंची शिवसेना कशी उत्तर देते हे पाहावे लागेल.

काय म्हणाले नारायण राणे?

सिंधुदुर्गमधील एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली होती. उद्धव ठाकरे सध्या फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना शिव्या देण्याच काम करत आहेत."

राणे पुढे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस बुद्धीमान आहेत. ते सज्जन आहेत त्यामुळे ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देत नाहीत."

ठाकरेंचे फडणवीसांवर हल्ले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना फुटल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना शिंगावर घेत आहे. आशात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सोडले नाही. गेल्या दोन अडिच वर्षात असा एकही कार्यक्रम, सभा नाही जिथे ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली नसले.

दरम्यान देवेंद्र फडणवीस ठाकरेंना थेट प्रत्युत्तर देत नसले तरी भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते मात्र, फडणवीसांच्या टिकेला उत्तर देत ठाकरेंव हल्लाबोल करत असतात.

नारायण रोणे आणि शिवसेना

नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा मनोहर जोशी यांच्यानंतर बाळासाहेबांनी राणेंना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती.

पुढे उद्धव ठाकरे यांच्याशी उडालेल्या खटक्यांनंतर नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही मुलांसह काँग्रेमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना राणेंना अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. तर एक पुत्र खासदार तर दुसरे आमदार झाले.

पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राणे यांनी आपला पक्ष काढला व नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी मिळाली होती. राणे सध्या सिंधुदुर्गचे खासदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT