Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : महिलांकडून हल्ला करुन घेणारे नपुंसक, उद्धव ठाकरे आक्रमक!

Sandip Kapde

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. रोशनी शिंदे यांना ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत फेसबुकवर पोस्ट केली म्हणून मारहाण झाल्याची झाल्याचा आरोप आहे. या घटनेचे ठाण्यात राजकीय पडसाद उमटत आहेत. 

शिवसेनत बंड झाले तेव्हापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद निर्माण होत आहेत. ठाण्यात जास्त वादावादी होते. कारण ठाणे एकनाथ शिंदेंचा गड मानला जातो. शिंदे शिवसेनेत असताना ठाणे शिवसेनेचा गड होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखी ठाण्यात येऊन या घटनेची माहिती घेतली. 

रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना मारहाण झाल्याचे निश्चित करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यास गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालायाने सरकारबद्दल नपुसंक हा शब्द वापराला. त्याची प्रचिती काल आली. ठाण्याची ओळख पुसून गुंडांची ओळख निर्माण होत. त्यांनी काही कराव आणि आम्ही सहन कराव, हे चालणार नाही. महिलांकडून हल्ला करुन घेणारे नपुंसक आहेत. गुंड महिलांनी हा हल्ला केला आहे. आयुक्ताना भेटायला गेलो तर ते हजर नव्हते.  

उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहीली नाही. फडतूस गृहमंत्री आणि गुंड मुख्यमंत्री महाराष्ट्राल लाभले आहेत. मिंधे गटाची गुंडगिरी वाढत चालली आहे, असे ठाकरे म्हणाले.

गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीसांना हे झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT