Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : "मी राजीनाम्याच्या निर्णयावर समाधानी, जीवदान मिळालं ते तात्पुरतं…"

रोहित कणसे

राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल दिल्यानंतर या निकालावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे सरकार वाचलं या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या त्या निर्णयावर समाधानी आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "सगळ्या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं आहे, उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं, पण त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ असा होतो की, आत्ताचं अस्तित्वात असलेलं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर मी राजीनामा दिला नसता तर मला त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. म्हणजे हे सरकार बेकायदेशीर आहे. मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे'', असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, "जीवदान मिळालं असेल तर ते तात्पुरतं आहे. एक रिझनेबल टाइमलादेखील मर्यादा आहेत. जसं मी माझ्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला तसं या बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहीजे. मी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्री झालो असतो. एवढे धिंडवडे निघाल्यानंतर आपण निवडणूकीला सामोरे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी दिला आहे. पण लोकशाहीत सगळ्यात शेवटचं न्यायालय जनतेचं असतं, त्यामध्ये जायला काय हरकत आहे. हा फैसला जनतेवर सोपवूया आणि जनतेचा कौल स्विकारूया असे उद्धव ठाकरे म्हणाले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT