Uddhav thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ज्यांच्या गळ्यात घंटा बांधली त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार; ठाकरेंची तोफ धडाडली

सकाळ डिजिटल टीम

मालेगाव - शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी याआधी कोकणातील खेड येथे जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आज उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात सभा होत आहे. या सभेत उद्धव यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या काळात मालेगावात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. काय करायचं, असा प्रश्न होता. मालेगावकरांनी जे सहकार्य केलं, त्यासाठी सर्वांचे खूप आभार. तुम्ही नाव चोरलं, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, पण जीवाभावाची माणसं चोरू शकणार नाहीत.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर जोरदार हल्ला केला. ठाकरे म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल कांद्याला बाजार मिळाला नाही. भाव मिळाला नाही, पण मी तसं म्हणत नाही. कांद्याला भाव मिळाला, कांद्याला किंती खोके भाव मिळाला, अशा शब्दात उद्धव यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका केली. यावेळी ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्दावरून शिंदे सरकरावर जोरदार टीका केली.

उद्धव पुढ म्हणाले की, शेतकऱ्यांचे पुत्र असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. हे काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे. ज्यांच्या गळ्यात घंटा बांधली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं नाव न घेता उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT