Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session: उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारचं केलं अभिनंदन,म्हणाले...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला

रुपेश नामदास

Uddhav Thackeray: शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी ४० आमदार घेवून बंड केलं. दरम्यान महाराष्ट्रात सत्तांतर झाले त्यांनंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली. आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्रचे नवे मुख्यमंत्री झाले त्यामुळे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे आणि ठाकरे असा सामना राज्यात रंगू लागला.

येवंढ होवून देखील आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे. त्याला कारण ठरलं विधानसभेत एकमताने मंजूर केलेला ठराव. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे.

आज विधानसभेत कर्नाटक विरोधातील ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक विरोधातील ठराव मांडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी खटला लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली.

हेही वाचा-जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

तसेच कर्नाटक सरकारच्या वर्तनाचा निषेध केला. महाराष्ट्रातली वाहनांवर हल्ले झाले. सीमेवरची ८६५ गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करणार. राज्यातील वाहनांवर हल्ले झाले. सीमावादावा चीथावणी देण्याच जाणीवपूर्वीक काम कर्नााटक सरकारने केलं.

सीमाभागातील मराठी माणसांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला अर्थिक मदतीची घोषणा यावेळी करण्यात आली. कुठूंबाला दरमहा २० हजाराची मदत जाहिर केली.

तसेच सांस्कृतीक शैक्षणिक मदत जाहिर करण्यात आली. यासोबत सीमावरती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखून ठेवणार. असं या ठरावात मांडण्यात आलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajiraje Chhatrapati: शिवरायांचा उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचणार, मात्र...; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसरकारकडे मागणी!

Wimbledon 2025 : विम्बल्डनची नवी राणी कोण? स्विअतेक-ॲनिसिमोवा एकेरीची अंतिम लढत

Misfire: मित्राला पिस्टल दाखवत होता, अचानक सुटली गोळी; समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील घटना

Maharashtra Sahitya Parishad : ‘मसाप’ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; कृती समितीकडून धर्मादाय आयुक्तांकडे मागणी

Parbhani News: संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू; निवासी शाळेत घटना, दांपत्याविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT