Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis esakal
महाराष्ट्र

महाराष्ट्रानंतर 3 राज्यांच्या मदतीनं भाजप इतिहासाची पुनरावृत्ती करणार

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात लवकरच भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात लवकरच भारतीय जनता पक्षाचं सरकार (Bharatiya Janata Party Government) स्थापन होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला मोठी मदत मिळू शकते. तसंच 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते.

कारण, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्ये (Bihar) पक्ष आधीच सत्तेत आहे. आकडेवारी पाहिली तर या राज्यांमधून 168 लोकसभेचे सदस्य निवडून येतात. आता 2024 चं समीकरण भाजप (BJP) तीन राज्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्या बाजूनं कसं करू शकतं हे आपण सविस्तरपणे समजून घेऊ.. 2019 मध्ये या तीन मोठ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं म्हणजेच, एनडीएचं सरकार (NDA Government) होतं. इथं 168 जागांपैकी एनडीएला 144 जागा मिळाल्या होत्या. त्याचाच परिणाम असा झाला की, लोकसभेत युतीनं विक्रमी 352 चा आकडा गाठला होता. भाजपकडं महाराष्ट्रासाठी मोठी विकास योजना आहे. यामध्ये मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची सुधारणा करणं आणि 2024 मध्ये मतदारांसमोर ठेवणं समाविष्ट आहे.

2019 च्या आधी पक्षानं बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. यापूर्वी कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाशी संबंध तोडले होते. त्याच वेळी, भाजपला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यूपीमध्ये सरकार स्थापन करण्यात यश आलं. तर, महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वेगळं होण्यापूर्वी भाजप राज्यात शिवसेनेसोबत सरकार चालवत होतं.

देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

फ्लोअर टेस्टच्या मागणीपासून ठाकरेंच्या राजीनाम्यापर्यंत अनेक मोठ-मोठ्या बातम्या समोर आल्यानं महाराष्ट्रात मंगळवारनंतर मोठी राजकीय खळबळ उडाली. आता पुढील काही दिवस राजकीय उलथापालथीचा हा फेरा कायम राहण्याची शक्यता आहे. कारण, भाजपनं गुरुवारी सकाळी 11 वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रात्री उशिरा किंवा उद्या म्हणजेच, शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT