Malegaon Uddhav Thackeray Sabha  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'हे बाण नाहीत, ब्रह्मास्त्र आहेत' उद्धव ठाकरेंच्या विधानाचा राजकीय अर्थ काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः नागपूरच्या रामटेकमधील शिवसैनिकांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना उद्धव ठाकरेंनी 'हे माझे बाण नसून ब्रह्मास्त्र आहेत' असं विधान केलं आहे.

नागपूर येथील रामटेक येथून कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पायी मुंबईत पोहोचले. आज रामनवमीच्या दिवशी त्यांनी ठाकरेंची भेट घेतली. या कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, धनुष्यबाण चोरला असला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत. माझ्या संविधानाचं आणि लोकशाहीचं मीच रक्षण करणार.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, प्रभू श्रीरामांसाठी सेतू निर्माणावेळी खारुताईनेही मदत केली होती. तेव्हा प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन दगडं तरंगत होते. आजही दगडं तरंगत आहेत आणि दगडंच राज्य करत आहे. तुम्ही सगळे ठामपणाने माझ्यासोबत आहात, त्यामुळे आपण संविधानाचं, लोकशाहीचं रक्षण करु.

'तुम्ही सगळे माझे बाण नाहीत तर ब्रह्मास्त्र आहात' असं विधान करुन ठाकरेंनी बाणावरुन सर्वांना अचंबित केलं आहे. कारण शिवसेना आणि धनुष्य-बाण हे वेगळं नातं आहे. आज जरी उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष आणि पक्षचिन्ह निसटलं असलं तरी त्यासाठी त्यांचा सर्वोच्च न्यायालयात लढा सुरुय. तरीही त्यांना 'बाणा'ऐवजी ब्रह्मास्त्र शब्दाचा उल्लेख केल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT